बहुजननामा ऑनलाईन टीम – माणूस वर्षानुवर्षे आपल्या भविष्याबद्दल जाणण्यास उत्सुक असून ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थानाशिवाय हातांवरील रेषांच्या आधारावर भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ भारतातच हस्तरेषा शास्त्र नसून ते जगभरात प्रसिद्ध आहे. हाताच्या रेषांवरून फक्त माणसाचे चरित्र आणि स्वभावच जाणून घेता येते असे नाही तर माणसाच्या भविष्याबद्दलही अनेक गोष्टी जाणून घेता येतात. हस्तरेषांमुळे जीवनातील सर्व पैलूंबद्दल अधिक माहिती जाणून घेता येते. हस्तरेषा शास्त्राचा जन्म भारतात झाला असून त्याचे शिक्षण पुढे चीन, तिबेट, इजिप्त, इराण आणि युरोपमध्ये सुरु झाले, असे मानले जाते.
ग्रीक विद्वान एनाकॅगोरस यांनी आपल्या काळात हस्तरेषांचा सखोल अभ्यास करून त्यांचे ज्ञान साधू आणि संतांना दिले. थोर तत्वज्ञानी अरिस्टोटल यांनी अलेक्झांडरला या ज्ञानाची जाणीव करून दिली असून अलेक्झांडरला हस्तरेषा शास्त्रात जास्त रस असल्याचे म्हटले जाते. तसेच त्यांना त्यांच्या हस्तरेषांकडे पाहून आपल्या अधिकाऱ्यांच्या चारित्र्याचे मूल्यांकन करण्यास सुरुवात केल्याचेही म्हटले जाते. त्याचे कोणतेही पुरावे नसले तरी अलेक्झांडरने त्याच्या हातावरील रेषांचा सखोल अभ्यास करून त्या अनुषंगाने त्याच्या आयुष्याची नीती आखली असल्याचेही अनेक लोकं म्हणतात. पण अलेक्झांडरच्या हातावरील रेषा आणि खुणा आजपर्यंत कोणालाही दिसल्या नाहीत. अलेक्झांडरच्या तळहातावर एक अद्वितीय चिन्ह होते, जे जगातील फारच थोड्या लोकांच्या हातावर असते, असा इजिप्तशियन विद्वानांचा विश्वास आहे. हे चिन्ह दोन रेषांमध्ये स्पष्ट असले पाहिजे.
याचे सत्य शोधण्यासाठी मॉस्कोच्या एसटीआय युनिव्हर्सिटीने एकी संशोधन केले. तेव्हा हस्तरेषांवरील एक्स अक्षर आणि त्याचे भाग याच्याशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जवळजवळ २ दशलक्ष लोकांवर हा अभ्यास करून माहिती गोळा केली. या संशोधनानंतर एक निष्कर्ष काढला गेला तो असा होता, ज्या लोकांच्या हातात हा क्रॉस मार्क होते ते एक महान नेते किंवा समाजातील खूप प्रभावशाली व्यक्ती होते. अशा लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तसेच अलेक्झांडरशिवाय जगातील इतरही बड्या नेत्यांच्या जसे की अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याही हातावर हे चिन्ह होते. ज्या लोकांच्या हातावर हे चिन्ह आढळते ते या जगातून गेले तरी पुढील अनेक वर्षे ते आठवले जातात. तसेच ज्या लोकांच्या एकाच तळहातावर हे चिन्ह आहे ते त्यांच्या जीवनात त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि जास्त प्रसिद्धी मिळते.
Visit : bahujannama.com