मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंय वॉरियर हा सिनेमा 10 जानेवारील रोजी रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमानं 150 कोटींचा आकडाही सहज पार केला आहे. अजून या सिनेमाची कमाई थांबायचं नाव घेत नाहीये. अजूनही सिनेमाची कमाई सुरूच आहे. हा सिनेमा आता महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
Maharashtra Government makes film 'Tanhaji' tax-free in the state. pic.twitter.com/l3DttfvXJW
— ANI (@ANI) January 22, 2020
राज्य सरकरानं आता तान्हाजी सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेनंही याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. हा सिनेमा याआधी उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला होता. यावेळी अनेकांनी प्रश्न केला होता की, सिनेमा महाराष्ट्रात कधी टॅक्स फ्री होणार. अशातच आता महाराष्ट्रातही हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
तान्हाजी सिनेमानं टोटल धमालला मागे टाकलं आहे. गोलमालनंतर सर्वाधिक कमाई करणारा हा अजय देवगणचा दुसरा सिनेमा ठरला आहे. तान्हाजी हा सिनेमा सैफ अली खान आणि काजोल यांच्या सिनेमांपैकी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com