पुणे : बहुजननामा ऑनलाईन – रंगतदार दिसणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाचे बरेच चाहते आहेत. मात्र हा येवले चहा पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचे समोर आले आहे. कारण येवले चहावर पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. या दुसऱ्यांदा केलेल्या कारवाईत येवले चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. रंगतदार दिसणाऱ्या येवले चहामध्ये फूड कलर वापरत असल्याचे केंद्र सरकारच्या एफडीए विभागाच्या प्रयोगशाळेतल्या अहवालामध्ये सिद्ध झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, FDA कडून येवले चहावर कारवाई करण्यात आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं हे उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. येवले चहा यांच्यावर ही झालेली काही पहिली कारवाई नसून यापूर्वी देखील FDA कडून कारवाई करण्यात आली होती. पण त्यावेळी चहात कोणतीही भेसळ असल्याचे निष्पन्न झाले नव्हते. केवळ काही अन्नपदार्थांची पाकिटे जप्त करण्यात आली होती ज्यावर कोणतीही उत्पादन किंवा एक्सपायरीची तारीख नव्हती. मात्र आता झालेल्या कारवाईमध्ये चहाला लाल रंग येण्यासाठी चहामध्ये सिंथेटीक फूड कलर असल्याचे केंद्रीय प्रयोगशाळेच्या अहवालात सिद्ध झाले आहे.
येवले चहाच्या डचणीत वाढ
यापूर्वीही येवले चहावर कारवाई झाली होती. पुण्यातील कोंढवा भागातील कारखान्यात मेलानाईट हा पदार्थ आढळून आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा येवलेवर कारवाई झाली आहे.त्यामुळे येवले चहा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Visit : bahujannama.com