मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Mumbai Crime | मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्धनग्न फोटो (Half naked photos) समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन एका तरुणाने मुंबईतील अल्पवयीन मुलीकडून तब्बल 58 हजार रुपयाला गंडा मारला आहे. ब्लॅकमेल (Blackmail) करणाऱ्या आरोपी तरुणाला पीडित मुलीने आपल्या घरातील दागिने चोरून विकले आहे. घरातील दागिने गेल्याच लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणांवर गुन्हा (Mumbai Crime) दाखल करण्यात आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय ओव्हाळ (Sanjay Ovhal) (वय,23 मूळ. रा.उस्मानाबाद ) असं आरोपी तरुणाचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी तरुण (accused youth) हा मालवाहक टेम्पोवर
वाहनचालक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी आरोपी तरुणाची पीडितेशी इन्स्टाग्रामवरून
ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात संवाद वाढत जाऊन चांगली मैत्री झाली होती. तर पीडित 17 वर्षीय मुलगी मुंबईतील कुरार परिसरातील (Kurar area) रहिवासी असून ती इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकते. दरम्यान, एकेदिवशी व्हिडीओ कॉलवर (Video call) बोलत असताना आरोपीनं पीडित मुलीला अर्धनग्न होण्यास भाग पाडलं. कपडे नाही काढले तर चाकूनं माझं काहीतरी बरं वाईट करेल, अशी धमकी दिली. म्हणून भीतीने पीडित मुलीने आरोपीसमोर अर्धनग्न झाली. मात्र, आरोपीनं गुपचूप ही घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. नंतर आरोपी तरुणाने हा अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली. आणि 10 हजाराची मागणी केली.
यांनतर आरोपी तरुणाने पैसे मागण्याचा सपाटाच लावला. एवढे पैसे कुठून द्यायचे म्हणून मुलीने भीतीपोटी घरातील दागिने विकून 58 हजार रुपये दिले. मात्र याबाबत दागिने कुठे गेले याबाबत घरच्यांना समजताच मुलीकडून याबाबत अशी घटना समोर आली. यावरून कुटूंबियांनी कुरार पोलीस ठाण्यात (Kurar police station) याबाबत तक्रार दाखल केली. यावरून आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.