मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील भांडुपमध्ये कोविड हॉस्पीटलमधील मृतांचा आकडा 10 वर पोचहला आहे. हे हॉस्पीटल एका मॉलमध्ये सुरू होते, जिथे रात्री उशीरा आग लागली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अगोदर हॉस्पीटलमध्ये एका भागात आग लागली होती. काही तासानंतर हॉस्पीटलच्या आणखी एका भागात आग लागली.
ज्या ड्रिम मॉलमध्ये आग लागली आहे, तो 2009 मध्ये बांधण्यात आला होता. या मॉलमध्ये सुमारे 1000 छोटी दुकाने, 2 बँक्वेट हॉल आणि एक हॉस्पीटल आहे. कोरोना हॉस्पीटल सुरु करण्यासाठी मागच्या वर्षी हॉस्पीटलला कंडीशन ओसी देण्यात आले होते. मॉल वादग्रस्त आहे आणि चार वर्षापूर्वी एनसीएलटीने एक प्रशासक नियुक्त केला होता.
भाजपाने बीएमसीवर साधला निशाणा
मॉलमध्ये लागलेल्या आगीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बीएमसीवर निशाणा साधला आहे. किरीट सोमैया म्हणाले, ड्रीम मॉलच्या प्रमुख चार मजल्यांवर कोविड हॉस्पीटलमध्ये आग लागली आहे, ज्यामध्ये 3 आयसीयू रूग्णाचा मृत्यू झाला आणि 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, हा मॉल पीएमसी बँक मनीकडून एचडीआयएलद्वारे बांधण्यात आला आहे, हॉस्पीटलसाठी ओसी नव्हते, कोविडच्या दरम्यान बीएमसीने अवैध प्रकारे ओसी दिले, कोणतीही सुरक्षा किंवा फायर सिस्टम नाही.
बीएमसी मेयरला नव्हती हॉस्पीटलची माहिती
या घटनेवर बीएमसीच्या मेयरने म्हटले, मी पहिल्यांदा मॉलमध्ये हॉस्पीटल पाहिले आहे. आग लागण्याचे कारण शोधले जात आहे. कोरोना रूग्णांसह इतर रूग्णांना दुसर्या हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल.
हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते 76 रूग्ण
या हॉस्पीटलमध्ये एकुण 76 रूग्ण होते ज्यामध्ये 73 कोरोना रूग्ण होते आणि तीन अन्य आजराचे होते. यापैकी 30 रूग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे तर तीन जणांना फोर्टिस हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य रूग्ण स्वत: वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये भरती झाले आहेत.