मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील विरार भागात 9 वर्षीय मुलीच्या घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. असे सांगितले जात आहे की आरोपीने स्वतःला डिलीव्हरी बॉय म्हणून वर्णन केले होते, त्यानंतर तो घरात शिरला. त्यावेळी निर्दोष घरात एकटीच होती. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने घराबाहेर पडण्यास नकार दिला असता ही घटना उघडकीस आल्याचं सांगण्यात येत आहे.
शॉकमध्ये आहे मुलगी-
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला या घटनेचा धक्का बसला आहे. तिला वाटतात आहे की, तो आरोपी पुन्हा येईल. अशा परिस्थिती ती मुलगी बाहेर जात नाहीये आणि तिच्या आईला देखील जाऊ देत नाहीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने सांगितले की, आरोपी बुधवार रात्री ३१ जुलैला त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी मुलगी घरात एकटीच होती. त्या व्यक्तीने स्वत:ला डिलिवरी बॉय सांगितल्याने मुलीने दरवाजा उघडला. आरोपीने मुलीला पाणी मागितले त्यानंतर घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन हे दुष्कर्म केले.
पोलीसांनी सांगितले की, आरोपीने मुलीला बेडरुमध्ये नेले आणि मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पिडितेला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. मुलगी एवढी घाबरलेल्या अवस्थेत होती की तिने कुटूंबीय घरी आल्यावर देखील घडलेली घटना त्यांना सांगितली नाही. त्यानंतर जेव्हा मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी रडण्यास सुरुवात केली तेव्हा आईने विचारलेल्या प्रश्नांवर बोलते होऊन घडलेली घटना सांगितली. ही घटना ऐकून तिच्या आईला धक्का बसला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.