मुंबई / मुलुंड : Mulund News । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये दुकानाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. शनिवार आणि रविवार वगळून बाकी दिवस दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) निश्चित केला आहे. या काळात कोणी दुकाने सुरू केली तर त्यांच्यावर पोलीस प्रशासन (Police administration) कारवाई करतात. मात्र मुंबईच्या मुलुंड (Mulund) ठिकाणी एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका दुकानदाराने वीकेंड लॉकडाऊनमध्ये दुकान (Shop) अर्धवट उघडं ठेवून व्यवसाय केल्याप्रकरणी एका पोलिसाने दुकानदारास बेदम मारहाण केली आहे. कारण मात्र वेगळंच समोर आलं आहे.
Mulund News | took revenge for not giving farsan snacks police beat shopkeeper weekend lockdown mulund mumbai
मुलुंड परिसरातील एका दुकानदारानं वीकेंड लॉकडाऊनमध्ये रविवारी सायंकाळी दुकान अर्धवट उघडं ठेवून व्यवसाय करत असल्याने तेथील मुलुंड पोलीस ठाण्याचे (Mulund Police Station) पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पाटील (Sachin Patil) यांनी संबंधित दुकानदारास बेदम मारहाण केली आहे.
या पोलिसाने काही दिवसांपूर्वी संबंधित दुकानदारास साडेचार हजार रुपयाचं फरसाण मागितलं होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
परंतु दुकानदाराने फरसाण देण्यास नकार दिला. मात्र, PSI पाटील (Sachin Patil) याने वीकेंड लॉकडाऊनचं कारण देत मारहाण केल्याचा दावा दुकानदार सुनील चौधरी (Sunil Chaudhary) यांनी केलाय.
तसेच, याप्रकरणी दुकानातील कामगाराला मारहाण करतानाचा व्हिडीओ समाज
माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
web title: Mulund News | PSI seeks revenge for non-payment; Shopkeeper beaten to death for weekend lockdown (video)
Surekha Sikri Passes Away | ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन