नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्र सिंग धोनी लवकरच क्रिकेट मैदानावर दिसणार असून तो आयपीएल २०२० ची तयारी करत आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असून २ मार्चला तो आपल्या टीममध्ये सामील होणार आहे. पण याच्या अगोदर धोनीचा फेसबुकवर टाकलेला एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात तो एका नव्या रूपात दिसत आहे. धोनी आता शेतीबद्दल विचार करत असून त्याचे कामही सुरु केले आहे.
३८ वर्षीय धोनीने आता जैविक शेती करायला सुरु केली असून तो आपल्या गावात खरबूज आणि पपई लावायला शिकत आहे. धोनीने आपल्या रिटायरमेंट प्लॅनवर काम करायला सुरु केले असल्याचे बोलले जात आहे. धोनीने आपल्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत “रांचीमध्ये २० दिवस खरबूज आणि पपईची ऑरगॅनिक शेती सुरु केली आहे. मी पहिल्यांदाच उत्सुक आहे,” असे लिहिले आहे.
या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये धोनी शेती सुरु करण्याअगोदर पहिले पूजा-आरती करताना दिसत आहे. तसेच धूप जाळले आणि नारळ फोडला. क्रिकेटपासून दूर जाणाऱ्या माहीने आयपीएलची तयारीची सुरुवात केली असून मंगळवारी रांचीच्या झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर जाऊन सराव केला. आयपीएल २००२ ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई चॅम्पियन्समधील मॅचने २९ मार्चला मुंबई येथे होणार आहे.