नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत दिल्लीत हिंसाचाराचे आरोप सातत्याने सुरू आहेत. आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, असे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामुळे ताहिर हुसेनच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या फोटोंमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की ताहिर हुसेन यांच्या छतावर पेट्रोल बॉम्बचा साठा आणि दगड व वीटांचा साठा आहे. इतकेच नाही तर दगड सोडण्यासाठी गिलवर देखील तेथे होते.
एका अहवालात असे दिसून आले आहे की, आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांनी आपल्या समर्थकांना आणि स्थानिकांना दगडमार करण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये ताहिर हुसेन यांचे समर्थक त्याच्या घराच्या छतावर दगडफेक करताना पाहू शकता. विरोधकांना रोखण्यासाठी ताहिर इकडे-तिकडे फिरत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
ताहिर यांच्या परिसरात घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला गेला. त्यानंतर स्थानिकांनी ताहिर यांच्या घराच्या आत दगडफेक करणाऱ्यांवर हल्ला केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ताहिर यांनी स्पष्टीकरण देताना स्वत: ला पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ प्रसिद्ध करुन पोलिसांनी वाचवले असे सांगितले.
त्याचवेळी या हिंसाचारात ठार झालेल्या इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चा कर्मचारी अंकित शर्मा याच्या कुटुंबीयांनी आपच्या नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावरही आपल्या मुलाच्या मृत्यूचा आरोप केला आहे. अंकित घराबाहेर पडला आणि पुन्हा परत आला नाही, असा आरोप अंकितच्या कुटुंबीयांनी केला. ते म्हणाले की, अंकित शर्माला मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याचा मृतदेह सापडला.