अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – MP Navneet Rana | राज्यात मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांना एका अज्ञात व्यक्तीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांचा हितचिंतक असणार्या या कथित अल्पसंख्यांक व्यक्तीने पत्रात खासदारांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. (MP Navneet Rana)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खासदार नवनीत राणा यांना त्यांचा हितचिंतक असणार्या कथित अल्पसंख्यांक व्यक्तीने पाठवलेल्या पत्रात सावधानतेचा इशारा देत म्हटले आहे की, मी आपल्या शहरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी शासकीय नोकरी करत आहे. आपण माझ्या वडिलांची कोरोना काळात मदत केली होती. काही लोक आपला पाठलाग करत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे. अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयीत लोक आले आहेत. हे लोक तुमच्या घरी येऊन गेले आहेत, असा धक्कादायक माहिती या पत्रात दिली आहे. (MP Navneet Rana)
नवनीत राणा यांना आलेले हे पत्र त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. पत्राच्या शेवटी खुदा हाफिज, असे लिहिले आहे. खासदार नवनीत राणा या सध्या दिल्लीत आहेत. या पत्रावर त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.
Web Title :- MP Navneet Rana | mp navneet ranas life in danger a letter sent by an unknown person
हे देखील वाचा :
Maharashtra Political Crisis | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा