मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) अस्तित्वात आल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अनेक निर्णयांचा सपाटा लावला आहे. अवघ्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 500 पेक्षा जास्त जीआर काढले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आता आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात दहीहंडीला (Dahihandi) सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्यात येणार आहे. तसे पत्र सचिवांना देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, शिंदे गटातील (Shinde Group) आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी दहीहंडी सणाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करुन सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. यंदा 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी यासाठी सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते.
दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करून दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. @mieknathshinde साहेबांना निवेदन दिले. दहीहंडी हा लोकप्रिय सण असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वांना उत्सवाचा आनंद लुटता येईल. #dahihandi2022 pic.twitter.com/5rHoLWYA2m
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) July 28, 2022
प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. दहीहंडीला राज्यातील काही ठिकाणी जिल्हाधिकारी सुट्टी जाहीर करतात. मात्र, आता राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाईल. तसे पत्र सचिवांना देणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – CM Eknath Shinde | cm eknath shinde will announce public holiday on dahi handi 19 august
हे देखील वाचा :
Maharashtra Political Crisis | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा