लखनऊ 🙁 बहुजननामा ) – उत्तर प्रदेशमधील एका सरकारी कर्मचाऱ्याच्या खात्यावर 6 लाख 38 हजार रुपये जमा झाले. मात्र संबंधितांनी हे पैसे चुकून जमा झाल्याचे सांगून ही या कर्मचाऱ्याने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. हे पैसे म्हणजे नरेंद्री मोदी यांनी आपल्या खात्यात पहिला हप्ता भरला असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला आहे.
उत्तर प्रदेशातील हरकोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीमधील परीक्षा नियंत्रक व सिव्हिल इंजिनियरींग विभागाचे प्रमुख प्रा.प्रदीप कुमार यांना युनिव्हर्सिटीकडून 6 लाख 38 हजार रुपयांचे देणे होते. मात्र याच विद्यापीठात प्रदीप कुमार नावाचा चतुर्थे श्रेणी कामगार काम करत आहे. प्राध्यापक प्रदीप कुमार यांच्या खात्यावर पैसे पाठवताना नामसाधर्म्यामुळे ते चतुर्थे श्रेणी कामगार असलेल्या प्रदीप कुमार यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.
विद्यापीठ प्रशासनाला याची जाणीव होताच त्यांनी पैसे परत करण्यासंबंधी सुचना केली. मात्र हे पैसे आपल्याला नरेंद्र मोदी यांनी 15 लाखातील पहिला हप्ता म्हणून दिल्याचा दाव करत पैसे परत करण्यास नकार दिला. तसे लेखी पत्रच प्रदीप यांनी युनिव्हर्सिटी प्रशासनाला दिले. विशेष प्रदीपने खात्यातील साडे चार लाख रुपये लगेच काढून घेत ते खर्च देखील केले. पैसे परत करण्यासंबंधी प्रदीपवर दबाव टाकला असता प्रत्येक महिन्याला आपण दोन दोन हजार रुपये करुन परत करु असे प्रशासनाला सांगितले आहे. सध्या युनिव्हर्सिटीने प्रदीपचे बॅंक अकाऊंट सील केले असून ते युनिव्हर्सिटीच्या रजिस्टार ऑफीसशी जोडले आहे.