नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात केली आहे. तसं मोदी सरकार त्यांनीच केलेल्या योजनांमध्ये नवनवीन सुधारणा करून त्यात बदल करत आहे. खेड्यापाड्यात गॅस मिळावा म्हणून मोदी सरकारने उज्ज्वला योजना सुरु केली होती. तसंच गॅसची सबसिडीही देण्यात येत होती. ज्या ग्राहकांना सबसिडी मिळत होती त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. तसंच ज्यांना मिळत नव्हती त्यांच्यासाठीही महत्त्वाची बातमी आहे.
आता तुम्ही इंटरनेटवर वेबसाइटवर जाऊन आपल्या एलपीजी गॅस पुस्तकाबद्दल सर्व माहिती घेऊ शकता. त्यासाठी गॅस सिलेंडर ग्राहकांची एलपीजी वेबसाइटवर एलपीडी आयडी असते. ही आयडी मोबाईल नंबर आणि गॅस एजन्सीसोबत रजिस्टर्ड केलेली असते. या आयडीला ओपन करून गॅस कनेक्शन संबंधी सर्व माहिती आपल्याला तेथे मिळणार आहे. तसंच त्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीच्या आयडीवर जाऊन एलपीजी कनेक्शन रजिस्टर्ड नंबरवरून लॉगईन करावे लागेल. तेव्हा कनेक्शन घेतल्यानंतर सब्सिडी आलीये की नाही हे पाहता येणार आहे.
जर आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसेल तर तो आपण पहिल्यांदा रजिस्टर्ड करून घ्यायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला या संबंधी सर्व माहिती मिळणार आहे. जर तुमच्या खात्यात सबसिडी येत नसेल तर ती का आली नाही, याचा तपास तुम्ही घरबसल्या करू शकता. तसंच या संबंधी तक्रारही करू शकता. हा एक अगदी सोपा उपाय आहे. तसंच लाखो लोक या सुविधेचा फायदा घेत आहे.