मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बँका एकीकडे विविध प्रकारचे शुल्क आकारत असतात याचा थेट परिणाम ग्राहकाच्या खिशावर होत असतो ज्यांना बँकेत पैसे ठेवण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट (BSBD) असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने BSBD संदर्भातील काही नियम शिथिल केले असून या खातेधारकांना आता चेक बुक आणि इतर सुविधा मिळणार आहेत. खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवायचे याची सक्तीही करू शकणार नाही.
RBI च्या नवीन नियमांनुसार बँकांना बचत खात्याप्रमाणे बीएसबीडी खात्यालाही सुविधा द्यायला सांगितलंय. यात कुठल्याही शुल्काशिवाय बँकेनं काही ठराविक सेवांबरोबर चेक बुकसारखी सुविधाही द्यावी.तसेच बीएसबीडी खातेधारकांना आपल्या खात्यात कमीत कमी पैसेही ठेवण्याची गरज नाही. तसेच त्यांना एटीएम सेवाही चार वेळा फ्री मिळणार आहे. खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवायचे यालाही मर्यादा नाही.
बँकेनं निश्चित केलेली रक्कम अनेक जण खात्यात ठेऊ न शकल्यामुळे त्यांना दंड भरावा लागत असे त्यामुळे आता याचा फायदा अनेकांना होणार असून आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने च्या या नवीन निर्णयाने सर्वांना हा दिलासा मिळणार आहे.