पुणे बहुजननामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम देशातील दरांवरही झाला. शुक्रवारी रात्री पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. आज पेट्रोलचे दर १५ पैसे प्रति लिटर कमी झाले आहेत. तर डिझेलचे दर १३ पैसे प्रति लिटरने कमी झाले आहेत. पुण्यात हे दर १५ पैशांनी कमी झाले आहेत.
असे आहेत पेट्रोलचे दर
आयओसीएलनुसार दिल्लीत पेट्रोलचे दर १५ पैसे प्रतिलिटरने कमी झाले आहेत. त्यानंतर दिल्लीत ७२.०८ रुपये, कोलकात्यामध्ये १४ पैसे प्रतिलिटर कमी केल्यानंतर ७४.७४ रुपये तर चेन्नईमध्ये १६ पैशांची कपात केल्यनंतर ७४.८८ पैसे दर आहेत. मुंबईत ७४.७४ रुपये एवढा तर पुण्यात पेट्रोलच्या किंमतीममध्ये १५ पैसे कपात झाली असून पुण्यातील दर ७७.४९ पैसे इतका आहे.
तर असे आहेत डिझेलचे दर
डीझेलच्या किंमतीमध्ये शुक्रवारी दिल्लीत १३ पैशांची घट झाली आहे. त्यानंतर दिल्लीत डिझेलची किंमत ६५.७५ रुपये प्रतिलिटर असतील. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलचे दर ६८.९४ रुपये आणि ६९. ४८ रुपये प्रति लीटर असतील. तर पुण्यात डिझेलचे दर ६७.६३ पैसे एवढा आहे.