बहुजननामा ऑनलाइन टीम – नरेंद्र मोदी सरकारने आज करदात्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपये आहे त्यांना जीएसटी मधून सवलत देण्यात आली आहे. ही मर्यादा याआधी 20 लाख रुपये इतकी होती. या व्यतिरिक्त ज्या व्यावसायिकांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रुपयांपर्यंत आहे ते कम्पोजिशन स्कीम निवडू शकतात.
Tax on cinema tickets, earlier between 35% to 110%, has been brought down to 12% & 18% in GST regime. Most items of daily use are in 0 or 5% slab. Construction of residential complexes saw a steep reduction in rates to 5% in general & 1% for affordable houses: Ministry of Finance https://t.co/VOosWaoaO8 pic.twitter.com/3LUNx6IXol
— ANI (@ANI) August 24, 2020
यापूर्वी केवळ 75 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना ही योजना निवडण्याचा पर्याय होता. वित्त मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये उत्पादकांच्या कंपोजीशन रेटमध्ये कपात करण्याचा उल्लेखही आहे. जीएसटी लागू झाल्यापासून बहुतेक वस्तूंवरील कराचा दर कमी करण्यात आला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, 28 टक्के करांच्या खाली केवळ लक्झरी व नाशवंत वस्तू आहेत. या टॅक्स स्लॅब अंतर्गत 230 वस्तू होत्या, परंतु आता 200 वस्तू कमी टॅक्स स्लॅबमध्ये हलवण्यात आल्या आहेत.
Now, Businesses with an annual turnover of up to Rs 40 lakh are GST exempt. Initially, this limit was Rs 20 lakh. Additionally, those with a turnover up to Rs 1.5 crore can opt for the Composition Scheme and pay only 1% tax. (1/5) pic.twitter.com/Jy589R1qNV
— Ministry of Finance (@FinMinIndia) August 24, 2020
घरांचा जीएसटी 1 टक्का
मंत्रालयाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की बांधकाम क्षेत्र आणि विशेषत: निवासी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. आता ते पाच टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबखाली ठेवले आहे. स्वस्त घरांवरील जीएसटी दर आता एक टक्का झाला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीच्या वेळी, करांची संख्या सुमारे 65 लाख होती. जी आता वाढून 1.24 कोटी झाली आहे. आता जीएसटीशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित झाली आहे. आतापर्यंत 50 कोटी रिटर्न ऑनलाईन दाखल झाले असून 131 कोटी ई-बिले तयार करण्यात आली आहेत.
सिनेमा तिकिटांवरील टॅक्स कमी केला
याशिवाय सरकारनं सिनेमा तिकिटांवरील टॅक्सही कमी केला आहे. यापूर्वी 35 ते 110 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये असलेले तिकिटांचे दर आता 12 आणि 18 टक्केवर आणले आहेत. याशिवाय हेअर ऑईल, टुथपेस्ट, साबण यांच्यावरील जीएसटी कमी करण्यात आली आहे. केशतेल, टूथपेस्ट आणि साबण यांच्यावर पूर्वी 29.3 टक्के इतका वस्तू आणि सेवा कर (GST) लागत होता. मात्र आता त्यांच्यावर 18 टक्के जीएसटी लागेल. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.