नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट देण्यासाठी आणि नॉन-असेन्शियल आयटम्सच्या आयातीला कमी करण्यासाठी सरकार फर्निचरची आयात थांबवू शकते. एका अधिकार्याने याबाबत माहिती दिली. जर मोदी सरकारने हा निर्णण घेतला तर चीनसह 4 देशांना मोठा झटका बसू शकतो. डिपार्टमेंट फॉर प्रोमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इन्टर्नल ट्रेडने सरकारला फर्निचरची आयात थांबवण्याचा प्रस्ताव दिला आहे.एका अधिकार्याने सांगितले, परराष्ट्र व्यापार महानिर्देशालयाची याबाबतीत एक अधिसूचना येऊ शकते. एका अधिकार्याने सांगितले, फर्निचर आयात थांबवणे म्हणजे इम्पोर्टर्सना इन्बाऊंड शिपमेंटसाठी लायसेन्स किंवा परवानगी घेण्याची आवश्यकता लागणार आहे.
चीन जगातील सर्वात मोठा निर्यातदार
वित्त वर्ष 2018-19 मध्ये भारताची फर्निचर आयात 4,221 करोड रुपये (60.3 करोड डॉलर) होती. यापैकी केवळ चीनमधून आयात 2,177 करोड रुपयांची (31.1 करोड डॉलर) आयात केली होती. चीनशिवाय भारत आयात करत असलेल्या देशांमध्ये मलेशिया, जर्मनी, इटली आणि सिंगापुर हे देश आहेत. चीन जगात विविध प्रकारच्या फर्निचरचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.
भारताला चीनची निर्यात सुमारे 7,000 करोड रुपये (100 करोड डॉलर) ची होती. या क्षेत्रात भारताची स्थिती कमजोर आहे. कारण हे क्षेत्र खंडीत आणि असंघटीत क्षेत्रात आहे. घरगुती फर्निचर उद्योगाची उलाढाल सुमारे 35,000 करोड रुपये (5 अरब डॉलर) आहे. निर्यात सुमारे 10,500 करोड रुपये (150 करोड डॉलर) होते. या महिन्याच्या सुरूवातीस सरकारने रिफान्इड पाम तेल आयातीवर अशाच प्रकारची बंदी आणली होती. या पावलामुळे मलेशियाच्या कमोडिटी शिपमेन्टवर परिणाम झाला आहे.
Visit : bahujannama.com