नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओ आपल्या धमाकेदार प्लॅन साठी ओळखला जातो. जिओ आपल्या प्रीपेड प्लॅनवर ग्राहकांना अनगिनत ऑफरही देत आहे. अलीकडे, जिओने 26 जानेवारीच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांना एक उत्कृष्ट ऑफर सादर करून बाजारात एक ठसा उमटविला आहे.
जीओ आपला आवडता प्लॅन म्हणजेच ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन ज्याची किंमत ५५५ रुपये आहे त्या प्लॅन वर ३०० रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. रीचार्ज एप्लीकेशन फोन पेमध्ये सामील होऊन जिओने ग्राहकांसाठी जोरदार ऑफर आणली आहे.फोन पे अँप्लिकेशन द्वारे तुम्ही Jio चा 555 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 300 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल. म्हणूनच, 555 रुपयांच्या रिचार्ज योजनेसाठी आपल्याला 255 रुपये द्यावे लागतील.
* जिओच्या -84 दिवसांच्या वैधता योजनेबद्दल बोलायचे, तर जिओच्या नव्या योजनेची किंमत 555 रुपये आहे.
* यात ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह 1.5 जीबी डेटा मिळतो.
* तसेच, जिओ ते जिओ अमर्यादित कॉलिंग आणि जिओला इतर नेटवर्कवर 3000 मिनिटे मिळतात.
* जिओमध्ये ग्राहकांना योजनेत दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळते.
* ही उत्तम योजना ग्राहकांची सर्वात पसंतीची योजना आहे.