औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये दौऱ्यावर असताना ते बोलत होते. आपल्याच पक्षात काही लोकं गद्दार असून मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावे मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. ते सध्या पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत.
राज यांनी थेट इशारा देत ‘मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. आपल्याला जोरात काम करायचं आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार,’ असे राज यांनी म्हटले. तसेच ‘गद्दारपणा करणाऱ्यांना पक्षात जागा नसून त्यांची मी हकालपट्टी करणार आहे. दोन दिवसात त्यांना पक्षातून हकालणार आहे’ असेही ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘बांगलादेशी घुसखोरांसाठी मी आंदोलन केले असून आता अफगाणी घुसखोर सापडले असून परिस्थिती गंभीर आहे. मी १५ दिवसांनी पुन्हा येईन तेव्हा सविस्तर बोलेल. आता मला जाण्याची रजा द्यावी.’