मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भाषणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. राज ठाकरेंना राजकारणात जरी म्हणावं असं यश अद्याप मिळालं नसलं तरीसुद्धा त्यांच्या सभेला जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित असतो. राज ठाकरेंचं भाषण त्यांच्या समर्थकांसह विरोधकही लक्ष देवून ऐकतात. राज ठाकरे भाषणाआधी (Raj Thackeray Speech) कशा प्रकारे तयारी करतात?, त्यांची अवस्था कशी असते?, याबाबत स्वत: राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सांगितलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाषणामध्ये काय बोलायचं आहे हे ठरवलेलं असतं मात्र अनेकदा जे मुद्दे ठरवलेले असतात अनेकदा ते राहुन जातात. मोठ्या कार्यक्रमाला स्टेजवर जाईपर्यंत हातापायाला घाम येत असल्याचं राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सांगितलं. मात्र एकदा का मी भाषणासाठी स्टेजवर उभा राहिलो की ही सर्व भीती निघून जाते. मला समोर कोण आहे काही माहित नसतं, असं राज ठाकरे म्हणाले. एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या होत्या.
राज ठाकरेंचं भाषण असतं त्या दिवशी आम्ही त्यांच्या रूममध्ये कोणाला जाऊन देत नाही. राज ठाकरे खूप वाचन करतात त्या दिवशी त्यांच्यावर एक स्ट्रेस असलेला दिसतो, त्यामुळे आम्ही त्यांना कोणालाही डिस्टर्ब करू देत नसल्याचं शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगाडा केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, शिवसेना (Shivsena) पक्ष सोडल्यावर मनसेची (MNS) स्थापना करण्याबाबत
काहीही ठरवलं नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
महाराष्ट्र दौरा (Maharashtra Tour) केला त्यामध्ये लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत
असं दिसलं त्यानंतर पक्ष स्थापन करण्याबाबत ठरवल्याचं ठाकरे म्हणाले.
Web Title : MNS chief raj thackeray on his speech aurangabad sabha
हे देखील वाचा :
Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन गुन्हेगारावर दोघांनी केला कोयत्याने वार; लोहगाव परिसरातील घटना