Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत, 24 तासाच्या आत माझ्या पत्नीची माफी मागा नाहीतर…’; किरीट सोमय्या आक्रमक !

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya on Sanjay Raut) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर आरोप करत थेट मानहानीची (Defamation) नोटीस पाठवली असून राऊतांना 24 तासाची मुदत दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय राऊत यांना मेधा सोमय्यांनी (Medha Somaiya) मानहानीची नोटीस दिली असून त्यांनी 24 तासात माझ्या पत्नीची माफी मागावी नाहीतर त्यांच्या विरोधात सिविल आणि क्रिमिनल मुलुंड पोलिसात तक्रार आणि कोर्टामध्ये (Court) याचिका (Petition) दाखल करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. राऊतांचा माझ्या पत्नीचा चारित्र्य हनन करण्याचा डाव आहे. मेधा सोमय्या गेली 35 वर्षे मुलांना शिकवत असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhva Thackeray) यांचे मुख्य प्रवक्ते आहेत. संजय राऊत हे भित्रे असून त्यांना धडा शिकवणार असल्याचं म्हणत सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला.
त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहोत, कारण त्यांच्याकडे एकही कागदपत्र नसल्याचं सोमय्यांनी सांगितलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय राऊतांचा आरोप
किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा टॉयलेट घोटाळा (Toilet Scam) लवकरच बाहेर काढू, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
त्यासोबतच राऊत यांनी यासंबंधी पुराव्याचा एक व्हिडीओ ट्विट केला होता.
Web Title :- Kirit Somaiya on Sanjay Raut | bjp leader kirit somaiya sent direct defamation notice shiv sena leader sanjay raut
हे देखील वाचा :
Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन गुन्हेगारावर दोघांनी केला कोयत्याने वार; लोहगाव परिसरातील घटना
Comments are closed.