बहुजननामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) औरंगाबादच्या (Aurangabad) दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी जाताना पुण्यातील (Pune) वढू तुळापूरमध्ये (Tulapur) छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. राज ठाकरेंचा तेथील दर्शन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (Ravikant Varpe On Raj Thackeray) आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंचा छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंवर (Ravikant Varpe On Raj Thackeray) निशाणा साधला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडीओची चर्चा होत आहे त्यामध्ये, संभाजी राजे वडिलांशी भांडून मुघलांना मिळाले होते हेही तितकंच सत्य आहे. ज्यांच्याविरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळालात हे सत्यच असल्याचं राज ठाकरे म्हणत आहे. याचाच धागा पकडत राज ठाकरेंनी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe On Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. नतमस्तक व्हायला चाललाच आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा @mnsadhikrut pic.twitter.com/5BwquU4CHM
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) April 30, 2022
राज ठाकरे शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. नतमस्तक व्हायला चाललाच आहात तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा, असं म्हणत वरपे यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, राज ठाकरेंची उद्या औरंगाबादमध्ये सभा असल्याने औरंगाबादकडे मार्गस्थ झाले आहेत.
मात्र औरंगाबादमध्ये पोहोचण्याआधीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीकास्त्र केली आहे. राज ठाकरे या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title :- Ravikant Varpe On Raj Thackeray | ncp tweets raj thackeray old video targeting chhatrapati sambhaji raje demands apology
हे देखील वाचा :
Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन गुन्हेगारावर दोघांनी केला कोयत्याने वार; लोहगाव परिसरातील घटना