नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोट्यावधी रुपयांचा हिरा हाती लागल्यानं हिऱ्यांच्या खाणीत काम करणाऱ्या एका मजुराचं नशीब चांगलंच चमकलं आहे. Lesotho च्या Letseng खाणीत हा मजूर काम करतो. हा हिरा 442 कॅरेट असल्याचं जेम डायमंड लिमिटेडनं सांगितलं आहे. याची किंमतही कोट्यावधीत आहे अशी चर्चा आहे. BMO कॅपिटल मार्केट ॲनलिस्टनुसार, हा 442 कॅरेटचा हिरा साधारण 135 कोटी रुपयांना मार्केटमध्ये विकला जाऊ शकतो. गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, Letseng येथील हिऱ्याची खाण ही आपल्या हिऱ्याच्या आकारासाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखली जाते. या खाणीतून जे हिरे निघतात त्यांना परदेशात मोठी किंमत असते.
— TimePass (@TimePassTalks) August 24, 2020
या खाणीत 2 वर्षांपूर्वी तब्बल 910 कॅरेटचा स्टोन मिळाला होता. गोन गोल्फच्या बॉलएवढा याचा आकार होता. 40 मिलियन डॉलर एवढी किंमत या हिऱ्याला मिळाली होती. हा एक वेगळ्या प्रकारचा स्टोन होता ज्याला जगभरात फार मागणी आहे. दरम्यान खोदकाम करत असताना गृहस्थाला अनोखा दगड सापडला होता. तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हाच दगड विकून या गृहस्थानं तब्बल 14.7 कोटी रुपये कमावले आहेत. काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीच्या हाती असाच एक दगड लागला होता. हा दगड विकून त्यानं 23.5 कोटी रुपये मिळवले होते.
डेलीमेलनं दिलेल्या माहितीनुसार, 2 वेळा कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या गृहस्थाचं नाव सॅनिनिऊ लॅजेर आहे. सॅनिनिऊ टांझानियाचा रहिवासी आहे. सॅनिनिऊ त्याठिकाणी खाणीत खोदकाम करण्याचं काम करतो. केनिया आणि झिंबाम्वे जवळ टांझानिया देश आहे. या माणसाचं वय 50 आहे आणि त्याला 30 मुलं आहेत. त्याला मिळालेल्या दगडाचं वजन 6.3 किलो होतं. सोमवारी खास समारंभात त्यानं हा दगड 14.7 कोटींना विकला. सॅनिनिऊची 3 लग्न झाली असून त्याला 30 मुलं आहेत. या रकमेतून शाळा आणि शॉपिंग मॉल तयार करण्याच्या विचारात सॅनिनिऊ आहे. एवढे पैसे मिळाले तरीही आपलं राहणीमान बदलणार नाही असंही तो म्हणाला आहे. 2000 गायींची देखभाल करण्याचं काम सुरूच ठेवणार असंही सॅनिनिऊनं सांगितलं. सॅनिनिऊला सापडलेला दगड खूप दुर्मिळ आहे. या दगडाला Gemstone म्हणतात.