पुणे : बहुजननामा ऑनलाइन – यंदा सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक मर्सिडीझ-बेन्झच्या जीएलई मॉडेलच्या सर्वच्या सर्व गाड्या विकल्या गेल्या आहेत. संपूर्ण देशभरातून मर्सिडीझ-बेन्झला अभूतपूर्व मागणी येत असल्यामुळे आधी आखणी करण्यात आलेल्या योजनेच्या तीन महिने आधीच सर्व जीएलई गाड्या विकल्या गेल्याची घोषणा मर्सिडीझ-बेन्झ इंडियाने केली आहे. २०२० मधील ऑटो-एक्स्पोच्या आधी भारतीय बाजारपेठेत येणार असलेल्या नवीन जीएलईच्या बुकिंग्सना सुरुवात झाली आहे. मर्सिडीझ-बेन्झच्या सर्वात प्रमुख गाड्यांमध्ये जीएलईचा समावेश झाला असून भारतात जवळपास १३००० गाड्या विकल्या गेल्या आहेत. नवीन जीएलई गाडी त्यातील अतुलनीय वैशिष्ट्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लक्झरी एसयूव्ही विभागात एक नवा, आधुनिक मापदंड ठरेल.
कार डिलिव्हरीचा आणखी एक नवा उच्चांक, धनत्रयोदशीला दिल्ली एनसीआरमध्ये:
दसरा आणि नवरात्रीमध्ये मुंबई व गुजरातेत २०० पेक्षा जास्त मर्सिडीझ-बेन्झ गाड्यांची विक्रमी डिलिव्हरी केल्यानंतर आता दिवाळीत देखील देशभरात सर्वत्र सर्वाधिक लोकप्रिय लक्झरी कार ब्रँड हा मान मर्सिडीझ-बेन्झने कायम राखला आहे. एकट्या दिल्ली-एनसीआरमध्ये २५० पेक्षा जास्त कार ग्राहकांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबरीने मुंबई, पुणे, गुजरात, कोलकाता, दिल्ली एनसीआर व पंजाब या प्रमुख बाजारपेठांमध्ये देखील मर्सिडीझ-बेन्झच्या 600 गाड्या सणांच्या सुमुहूर्तांवर ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.
मर्सिडीझ-बेन्झचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, “सणासुदीचा काळ आमच्यासाठी खूपच लाभदायक ठरला आहे. आमच्या गाड्यांना देशभरातील सर्व भागांमधून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या सध्याच्या सर्व जीएलई गाड्या योजनेच्या तीन महिने आधीच विकल्या गेल्या आहेत. आता आम्ही नवीन जीएलईसाठी बुकिंग्स सुरु करत आहोत. ही नवीन गाडी ऑटो एक्स्पो २०२० च्या आधी भारतात येईल. आम्हाला पक्की खात्री आहे की, आमची अत्याधुनिक नवीन जीएलई गाडी लक्झरी गाड्यांच्या विभागात नवी क्रांती घडवेल.”
ते पुढे म्हणाले, “ही सर्वोत्कृष्ट, अतुलनीय गाडी विकत घेण्याचा योग्य निर्णय घेणाऱ्या आमच्या ग्राहकांचा सणासुदीचा आनंद द्विगुणित झालेला पाहताना आम्हाला खूप समाधान मिळाले. सणांच्या दिवसांमध्ये कार डिलिव्हरीजची प्रचंड मोठी संख्या आमच्या ग्राहकांचा मर्सिडीझ-बेन्झ ब्रँडवरील विश्वास किती वाढला आहे ते दर्शविते. बाजारपेठेतील स्थिती आव्हानात्मक असताना देखील लक्झरी कार उत्पादक म्हणून ग्राहकांची इतकी मोठ्या प्रमाणावर पसंती आम्हाला मिळाली हे खूप महत्त्वाचे आहे. ग्राहकांनी आमच्या धोरणांना अनुकूलता दर्शविली आहे. आमच्या ग्राहककेंद्री दृष्टिकोनाचे इतके चांगले लाभ मिळत आहेत, ग्राहक इतके खुश आणि समाधानी आहेत ही आमच्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाची बाब आहे. विश बॉक्स या आमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने किमया घडवून आणली आहे. यामुळे लक्झरी कार विभागात मागणीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे आणि जास्तीत जास्त ग्राहक मर्सिडीझ-बेन्झ खरेदी करत आहेत.”
टी अँड टी मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विदुर तलवार यांनी सांगितले, “यंदाच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत. दिल्ली एनसीआर हे टी अँड टी मोटर्ससाठी खूप महत्त्वाचे मार्केट आहे. याठिकाणी आमच्या मॉडेल्सना मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादातून ग्राहक आमच्या ब्रँडबद्दल किती आनंदी आणि समाधानी आहेत हे दिसून येते. गेली दोन दशके या बाजारपेठेत एक विश्वसनीय ब्रँड हे आमचे स्थान कायम आहे. बाजारपेठेतील चढउतारांच्या काळात देखील ग्राहकांकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहक ठरत आहे. आधुनिक लक्झरी कार खरेदीदाराच्या मनात मर्सिडीझ-बेन्झ ब्रँडबद्दल किती विश्वास आहे ते यातून दिसून येते.”
सिल्वर ऍरोजचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. तुषार कुमार यांनी सांगितले, “मर्सिडीझ-बेन्झसोबत भागीदारी ही सिल्वर ऍरोजसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. बाजारपेठेत सणासुदीच्या काळात मिळत असलेला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्ही खूप खुश आहोत. आमची उत्पादने आणि ब्रँड यांच्याबद्दलची निष्ठा अधिक दृढ झाली आहे. लक्झरी कार बाजारपेठेत आमची उत्पादने अतुलनीय आहेत हा विश्वास बळावला आहे. मर्सिडीझ-बेन्झचा पोर्टफोलिओ अतिशय मजबूत आहे, ब्रँड आणि मालकीचा अनुभव बेजोड आहे. डिलिव्हरीजच्या विक्रमी आकड्यांमधून देखील हे सिद्ध झाले आहे. आम्हाला खात्री आहे की ही सकारात्मकता पुढे देखील कायम राहील आणि मागणी अजून जास्त वाढेल.”
Visit : Bahujannama.com
- हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
- बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
- कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
- तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
- ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार