पुणे : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रूपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. बारामतीच्या गोविंदबागेत आज प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.
राज्यभरातून हजारो कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवार यांना भेटण्यासाठी बारामतीमध्ये आले होते. दरम्यान, रूपाली पाटील यांनी देखील शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वकीयांनी ताकत दिली नसली तरी जी ऊर्जा शरद पवार साहेबांनी दिली. ती खुप प्रेरणादायी आहे. लेक म्हणून त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.
हरता-हरता जिंकता देखील येतं हे शरद पवारांकडून शिकायला मिळालं असल्याचं रूपाली पाटील यांनी यावेळी सांगितलं. यापुर्वी मी कधी बारामतीमध्ये आले नव्हते. मी आज त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. येथील वातावरण आणि आजचा उत्साह पण ऊर्जा देणारं आहे असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.