ऑनलाइन टीम – Men’s Health | टेस्टोस्टेरोन (Testosterone) पुरुषांमध्ये आढळणारे एक सेक्स होर्मोन आहे. हे हार्मोन फर्टिलिटी, सेक्श्युअल फंक्शन, हाडे आणि मांसपेशींच्या आरोग्यासाठी खुप आवश्यक आहे. वय वाढण्यासह टेस्टोस्टेरोनचा स्तर सुद्धा कमी होत जातो. काही मेडिकल कंडिशन किंवा खराब जीवनशैली सुद्धा या हार्मोनवर परिणाम करते. हेल्थ एक्सपर्टचे (Men’s Health) म्हणणे आहे की, काही विशेष फूड आयटम्स टेस्टोस्टेरोन प्रॉडक्शनचा स्तर वाढवण्याचे काम करतात. हे आयटम्स कोणते ते जाणून घेवूयात…
1. टुना फिश
टुना फिशमध्ये व्हिटॅमिन D मोठ्या प्रमाणात आढळते आणि हे टेस्टोस्टेरोन प्रॉडक्शनसाठी आवश्यक आहे आणि हे टेस्टोस्टेरोन प्रॉडक्शनसाठी आवश्यक आहे. टुना फिश हृदयासाठी खुप चांगले आहे. यात भरपूर प्रोटीन असते आणि खुप कमी प्रमाणात कॅलरी असते. हे फिश नॅचरल पद्धतीने टेस्टॉस्टेरॉन वाढवण्याचे काम करते. याशिवाय सेल्समन, सार्डिन आणि शेल फिश सुद्धा टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे काम करते. तुम्ही आठवड्यात 2-3 वेळा खाऊ शकता.
2. व्हिटॅमिन D युक्त लो फॅट मिल्क
दूधाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, टेस्टोस्टेरोन वाढते, कमी फॅटचे स्किम मिल्क चांगला पर्याय आहे.
3. अंड्याचे बलक
हे सवेन केल्याने टेस्टोस्टेरोन वाढते, कोलेस्ट्रॉलची समस्या नसेल तर रोज एक अंडे आवश्य खा.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
4. फोर्टीफाईड सीरियल्स
फोर्टीफाईड सीरियल्समध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असते. हे ब्रेकफास्टमध्ये खा. यामुळे टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढतो.
5. बीन्स
बीन्स पुरुषांसाठी (Men’s Health)लाभदायक आहे. शेंगा जसे की, छोले, डाळ आणि बेक्ड बीन्स हे झिंकचा चांगला स्त्रोत असते. यामुळे टेस्टोस्टेरोन वाढते. हृदयरोगापासून बचाव करते.
6. आले
रिसर्चनुसार, आले पुरुषांची फर्टिलिटी वाढवते. 2012 एका संशोधनानुसार, 3 महिन्यापर्यंत आल्याचे सेवन केल्याने टेस्टोस्टेरोनचा स्तर 17.7 टक्के वाढतो. स्पर्म क्वालिटी सुधारते.
7. डाळिंब
फर्टिलिटी आणि सेक्श्युअल फंक्शनमध्ये डाळिंब खुप परिणामकारक ठरते. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे, तणाव कमी होतो, टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढतो. डाळिंब ज्यूस टेस्टोस्टेरोनवर जास्त परिणामकारक आहे. याशिवाय मूड आणि ब्लड प्रेशर दोन्हीमध्ये सुधारणा होते.
Web Title : Men’s Health | men health best foods for increasing low testosterone married life hormone balance
Bitcoin Price | 2021 मध्ये 1 लाख डॉलरपर्यंत जाईल Bitcoin ची Price, एक्सपर्टने केला दावा
Hasan Mushrif | हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? जाणून घ्या कारण