पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर (Pune Navale Bridge Accident) अपघाताची मालिका सुरुच आहे. नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉईंट (Selfie point) जवळ गुरुवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, आज (शुक्रवार) याच ठिकाणी आणखी एक भीषण अपघात (Pune Navale Bridge Accident) झाला असून यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू (death) झाला आहे. तर 12 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात झाला असून एका टँकरने (tanker) 13 सिटर ट्रॅव्हलरला (13-seater traveler) जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रॅव्हलर पलटी होऊन सर्व्हिस रोडवर पडली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाल्याचे समजतेय. या अपघातामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने वेगात असलेल्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लावणे अश्यक होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात (Pune Navale Bridge Accident) वारंवार आपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Web Title : Terrible accident at ‘Selfie Point’ near Navale Bridge in Pune; 3 killed and 12 injured, Two critical
Bitcoin Price | 2021 मध्ये 1 लाख डॉलरपर्यंत जाईल Bitcoin ची Price, एक्सपर्टने केला दावा
Hasan Mushrif | हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? जाणून घ्या कारण
MLA Rohit Pawar | ‘गिरीश महाजनांना पैशांचा घमंड, म्हणून फोडाफोडीचे राजकारण’ – रोहित पवार
Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल