अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Ahmednagar Guardian Minister) सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्याला पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती मिळत आहे. दोन वर्षासाठी पालकमंत्री पद घेणार असल्याचे आपण पक्षाला सांगितले होते. त्यानुसार पालकमंत्री पद सोडणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) या तीन पक्षांनी एकत्र येऊ महाविकास आघाडी स्थापन केली. आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, पालकमंत्रीपद सोडण्याबाबत मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी सांगितले असले तरी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे मुश्रीफ यांना हे पद सोडावे लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update



किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात 2700 पानाचे पुरावे त्यांनी दिले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे पुरावे सोमय्या यांनी आयकर विभागाला (Income Tax Department) दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ चर्चेत आले होते.
Web Title : Hasan Mushrif | hasan mushrif will step down as guardian minister of ahmednagar district
Ajit Pawar On Pune Metro | ‘शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू करणार’
MLA Rohit Pawar | ‘गिरीश महाजनांना पैशांचा घमंड, म्हणून फोडाफोडीचे राजकारण’ – रोहित पवार
PIB Fact Check | मोदी सरकार नव्या योजनेंतर्गत नागरीकांना देणार 4000 रुपये? जाणून घ्या सत्य
Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल