बहुजननामा ऑनलाईन टीम : सोशल मीडियावर सध्या एका आयएएस ऑफिसरचा फोटो मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. आपल्या पाठीवर हा आयएसएस ऑफिसर २० किलो भाज्या वाहत १२ किलोमीटर पायी प्रवास करतात. राम सिंग (वय ४३) असे या ऑफिसरचे नाव असून तो मेघालयातील वेस्ट गारो येथे पोलीस उपयुक्त तसेच डिस्ट्रिस्ट मॅजिस्ट्रेट पदावर काम करीत आहे. राम सिंग यांनी फेसबुकवर लिहिले कि, ते प्रत्येक विकेंडला २१ किलो भाज्या स्वतः आपल्या पाठीवर आणतात.
राम सिंग म्हणाले कि, माझयाबरोबर माझी पत्नीदेखील फिटनेसवर फोकस करते, ती सुद्धा अनेकवेळा माझ्याबरोबर येत असते. गेल्या ६ महिन्यांपासून मी हा रुटीन सुरु केला आहे. तसेच बांबूच्या बनलेल्या मोठ्या टोकरीत मी पायी चालत भाज्या आणतो. ज्यामुळे प्लास्टिक आणि पॉलिथिन दोन्ही समस्या दूर होतात, असे त्यांनी सांगितले.
राम यांची प्रेरणा घेत अनेक ऑफिसर्स देखील त्यांना फॉलो करत आहे. राम यांनी सांगितले कि, मी नेहमी लोकांना पायी चालण्याचा सल्ला देतो. जवळचे अंतर असेल तर आपण पायीच गेले पाहिजे. मला वाटते कि, आपण आधुनिक समस्या पारंपरिक पद्धतीने सोडवू शकतो आणि या पद्धतीने आपण फिटदेखील राहू शकतो. ते पुढे म्हणाले कि, आठवड्याच्या बाजारात ऑरगॅनिक भाज्या मिळतात, भाज्या विकणारे लांबून भाज्या आणतात, तर मग आपण थोडे लांब जाऊन भाज्या का नाही आणू शकत ? दरम्यान राम सिंग सोशल मीडिया फार ऍक्टिव्ह असतात, पोस्ट केलेल्या फोटोसमध्ये ते कधी सामान्य नागरिकांसोबत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतात, तर कधी आपल्या पत्नी आणि मुलांबरोबर वेळ घालवताना दिसतात.
Visit : bahujannama.com