नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे, बुधवारीदेखील सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसली . बुधवारी दुपारी १.३५ वाजता सोन्याच्या किंमतीत ०.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या किमतीत ०.१६ टक्क्यांनी वाढ म्हणजे ६१ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह ऑक्टोबर महिन्यासाठी सोन्याच्या किंमत प्रति १० ग्रॅम ३८, १६९ रुपये होती.
त्याचबरोबर एमसीएक्स एक्सचेंजमध्ये डिसेंबर महिन्यातील सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. बुधवारी, एमसीएक्स एक्सचेंजला सकाळी १.४० वाजता, डिसेंबर महिन्याच्या सोन्याच्या किमतीत ०.०५ टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे २१ रुपये. या वाढीवर गोल्ड फ्यूचरची किंमत डिसेंबर महिन्यासाठी प्रति १० ग्रॅम ३८. ८८९ रुपये होती.
चांदीबद्दल बोलायचे झाल्यास बुधवारी सकाळी १. ४४ वाजता एमसीएक्स एक्सचेंजमध्ये डिसेंबर महिन्याच्या चांदीच्या भाव ०.४१ टक्क्यांनी म्हणजेच १९५ रुपये होते. डिसेंबर महिन्यात चांदीचा दर किलो ४८, २१७ रुपयांवर होता. दुसरीकडे, जागतिक पातळीवर बुधवारी सोन्याचे भाव ०. २७ टक्क्यांनी घसरून न्यूयॉर्कमध्ये प्रति औंस १ ५३६ डॉलरवर बंद झाला. महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी एचडीएफसी सिक्युरिटीज नुसार सोने ३३० रुपयांनी वाढून ३९,०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली. त्याचबरोबर चांदी ७३० रुपयांनी वाढून ४८,७२० रुपये प्रतिकिलोवर झाली आहे.
Visit : bahujannama.com