बहुजननामा ऑनलाईन – दहशतवादी कारवाया करणारा मोस्ट वॉन्टेड हाजी सईदला शिमला पोलीसांनी अटक केली. शिमल्यातील कुफरीतील काही फोटो त्यांने फेसबुकवर पोस्ट केल्या होत्या. त्याच्या पोस्ट पाहताच उत्तरप्रदेशच्या पोलीसांनी कारवाई सुरु करुन सापळा रचला. हाजी सईद उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी आहे. यानंतर पोलिसांनी त्याला मोस्ट वॉन्टेड काळ्या यादीत त्याची नोंद केली होती. मार्चमध्ये आणि जूनमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तो बेपत्ता होता. मात्र त्याची फेसबुकवरील पोस्ट पाहताच पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
फेसबुकवर त्याने शिमलाच्या जवळच असणाऱ्या कुफरीमधील फोटो शेअर केले होते. याकवर बसलेले त्याचे फोटो पाहताच पोलीसांना सापळा रचला. त्यांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले. त्यांनंतर त्यांनी एक टीम शिमल्याला रवाना केली. शेवटी अत्यंत चतुराईने त्याला तिथेच पकडण्यात आले.
मेरठचे पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले की, फेसबुकवरील छायाचित्रांच्या माध्यमातून आम्हाला त्याचे स्थान कळले. त्याच्या निश्चित ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही लोकेश ट्रेस केले आणि त्याला अटक केली. जूनमध्ये झालेल्या एका निदर्शनादरम्यान त्याच्यावर हिंसाचाराचा आरोप आहे. मेरठच्या भुसामंडी येथे अतिक्रमणे हटविण्यासाठी आलेल्या पोलीसांना जमावाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात दोनशे घरे जाळण्यात आली होती. पोलीसांनी काही लोकांना अटक केली तर काही फरार झाले होते.