बहुजननामा ऑनलाईन – फ्रान्समधील पॅरिसमध्ये लवकरच जी -७ परिषद होणार आहे.परिषदेसाठी जगभरातील नेते पॅरिसला पोहचले आहेत. तसेच एकमेकांच्या भेटीही घेत आहेत. अशीच ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि फ्रान्सचे इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीची चर्चा जरा जास्तच रंगली आहे आणि त्याला कारणही असेच आहे.
त्यांच्या भेटीदरम्यानचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. एकमेकांची भेट झाल्यानतंर ते दोघे एका खोलीत जातात. त्यावेळी एकमेंकाशी बोलताना जॉन्सन समोर बसलेल्या मॅक्रॉन यांच्यासमोर ठेवलेल्या टेबलावर अचानक पाय ठेवतात. हे पाहताच मॅक्रॉनही क्षणभरासाठी स्तब्ध होतात. आणि त्यानंतर दोघेही हसायला लागतात.
हा मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच सर्वांनी त्याला प्रतिक्रीयाही दिल्या आहेत. त्याच्या भेटीनंतर त्यांनी एलिस कॅम्पसमध्ये माध्यमांशी संवादही साधला आहे.जॉन्सन नेहमीच त्यांच्या अशा विचित्र हरकतींमुळे चर्चेत असतात. त्यांची तुलना कधी कधी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही केली जाते.
Today's debunked internet rager: The photo of Boris Johnson with his foot on the table.
In the Reuters clip, Macron jokes that the tiny table could be used with his chair as a recliner.
Johnson plays along.pic.twitter.com/3ssgTs3M39
— Richard Chambers (@newschambers) August 22, 2019