पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गृहिणी आणि घरकामगार महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी कारण त्याच आपल्या घरातील सदस्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवू शकतात असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी केले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अद्याप धोका टळलेला नाही आणि तज्ञ् तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असेही महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) म्हणाले. कोथरूड महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी केदार एम्पायर व नेहरू वसाहतीतील महिलांसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवीणाऱ्या औषधी किट च्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक वा भाजप सरचिटणीस दीपक पोटे, प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे,शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, महिला मोर्चा सरचिटणीस केतकी कुलकर्णी, उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ,आय टी सेल च्या शहर संयोजिका कल्याणी खर्डेकर,विद्याताई टेमकर, सुप्रिया माझीरे, नेहा तिळगूळकर,राजेंद्र येडे, रामदास गावंडे, श्रीकांत गावंडे, चंद्रकांत पवार इ उपस्थित होते. यावेळी बोलताना महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी कार्यक्रमा मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की वस्ती विभागातील महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिन यासह मास्क वा सॅनिटायझर चे वाटप करताना भगिनींना तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी शिक्षित करत आहोत. विविध वस्त्यांमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यावर महिला मोर्चा चा भर असणार आहे असेही फरांदे म्हणाल्या.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी वाहणारी महिला स्वतःच्या आरोग्याकडे कडे मात्र दुर्लक्ष करते, त्यामुळे त्यांच्या आरोग्यरक्षणासाठी महिला मोर्चा ने उचललेले पाऊल महत्त्वाचे आणि कौतुकास्पद असल्याचे ही सौ. खर्डेकर म्हणाल्या. यावेळी संदीप खर्डेकर, दीपक पोटे, जयंत भावे आणि पुनीत जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
महापौरांच्या हस्ते महिलांना आरोग्य सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कुलकर्णी यांनी केले तर सुप्रिया माझीरे यांनी आभार प्रदर्शन केले.
सुखी दाम्पत्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
राज-उद्धव एकत्र येतील काय? राज यांचे अवघ्या 2 शब्दात मार्मिक उत्तर, म्हणाले….
SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! बॅंकेने कामकाजाच्या वेळेत केला बदल, जाणून घ्या
कोविडमुळे होत आहे डायबिटीज, मुलांमध्ये सुद्धा हा धोका आला समोर