नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्ली सहित अनेक राज्यात नवीन वाहतूक नियम लागू झाले आहेत. या नवीन कायद्यानुसार, वाहनांना दंड आकारला जात आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही वाहतूक नियमांचं पालन करता कारण कोणत्याही ट्राफिक पोलिसांनी तुम्हाला अडवलं नाही, तर तुम्ही चुकीचे असू शकता.
SMS ने मिळते माहिती
अनेकदा घाईत किंवा गडबडीत असताना वाहतूक नियमांचं उल्लंघन होतच असतं. परंतु ते लक्षात येत नाही. तुम्हाला दंड लागू झालेला असतो परंतु तुम्हाला ते लक्षात येत नाही. जर तुमच्याकडून कळत नकळत वाहतूक नियम मोडला असेल आणि तु्म्हाला हे माहिती करून घ्यायचे असेल तर तुम्ही याची माहिती घेऊ शकता. नुकतंच अनेक दिल्ली एनसीआरमध्ये अनेक लोकांना एसएमएसद्वारे समजले आहे की, त्यांनी वाहतूक नियम मोडले आहेत. यामध्ये एक लिंकही असते जिथे आपण दंडाचं स्टेटस पाहू शकतो.
दंडाची माहिती देणारी लिंक पाठवली जाते
एसएमएसमध्ये आलेली लिंक ओपन केल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं की, त्यांच्या नावाने दंड आकारण्यात आला आहे. यात त्यांच्या गाडीचा फोटो आणि दंडाची रक्कम, तसेच वेळ आणि तारीख यांचाही उल्लेख होता. पू्र्व दिल्लीत राहणाऱ्या कृष्णाला एसएमएसद्वारे माहिती पडलं की, 20 ऑगस्ट रोजी ओव्हरस्पीडमध्ये गाडी चालवल्याबद्दल त्याला दंड आकारण्यात आला आहे जो पेंडिंग होता. यात कारचा फोटो आणि दंडाची रक्कम 400 रुपये दाखवण्यात आली होती.
अशी घ्या दंडाची माहिती
उत्तर दिल्लीत राहणाऱ्या कनिकाला कोणताही एसएमएस आला नाही परंतु तिने ऑनलाईन चेक केल्यानंतर तिला माहिती पडलं की, तिच्या नावावरील दंडही पेंडिंग आहे. तिच्या नावावर 100 रुपयांचा रेड लाईट जंपचा दंड पेडिंग होता. परंतु तिला याची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. ऑनलाईन लिंकवर नवीन वाहतूक नियमाच्या कलमाचाही उल्लेख असतो. यात तु्म्ही ऑनलाईन पेमेंटही करू शकता. जर तु्म्ही ऑनलाईन दंड भरला तर तुमचा मोबाईल नंबर आपोआप अपडेट होतो.
आपला दंड आणि त्याचा तपशील पाहण्यासाठी तुम्ही https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan या वेबसाईटवर जाऊ शकता. जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल तर, दंड तु्म्हाला ऑनलाईन जारी केला जाईल किंवा घरी पाठवला जाईल. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर https://parivahan.gov.in/parivahan//node/1978 या लिंकवर जाऊनही अपडेट करू शकता. जर तु्म्ही ठराविक कालावधीत किंवा सहा महिन्यात दंड नाही भरला तर तुमचं प्रकरण कोर्टात जाऊ शकतं.