बहुजननामा ऑनलाईन : साधारण आपण वयाच्या १५ व्या वर्षी आपण ९ वी पास होतो तर १६ व्य वर्षी आपण शालेय शिक्षण पूर्ण करतो. परंतु वयाच्या दहाव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण करुन. पुढच्या पाच वर्षात म्हणजेच वयाच्या १५ व्या वर्षी पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या सुषमा वर्माने आपले नाव कमवले आहे. संशोधन सुरु असतांना तिची इतर मागासवर्गीय प्रवर्गातली राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठीही निवड झाली आहे.
सुषमा बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठातून शिक्षण घेत आहे. ही शिष्यवृत्ती विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिली जाते. ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. कनिष्ठ संशोधकाला दरमहा २५ हजार तर वरिष्ठ संशोधकाला दरमहा २८ हजार रुपये महिना शिष्यवृत्ती मिळते.
सुषमाव्यतिरिक्त या विद्यापीठातून मोनिका पटेल, सुनीता ठाकूर, सना अस्लम आणि रिचा वर्मा या चार विद्यार्थ्यांची देखील या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. सुषमाचे वडील तेज बहादुर बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात सहाय्यक सुपरवायझर आहेत. सर्वाधिक कमी वयात शालेय शिक्षण पूर्ण करणारी विद्यार्थिनी म्हणून सुषमा हिची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील नोंद झाली आहे. सध्या ती विद्यापीठातून एनव्हॉयर्नमेंटल मायक्रोबॉयोलॉजी विषयात संशोधन करत आहे.