बहुजननामा ऑनलाईन – इटलीच्या अंतराळवीर लूका परमिटानो अवकाशात डीजे डान्स सादर करणारा पहिला अंतराळवीर ठरला आहे. लूकाने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर डीजेच्या धुनवर डान्स केला.
Luca Parmitano – First ever DJ set performed at International Space Station pic.twitter.com/FoyYZHtgk3
— RT (@RT_com) August 15, 2019
लूका परमिटानोने एका डिव्हाइसद्वारे डीजे डान्स सादर केला. या डान्सची तयारी त्याने आधीच केली होती. त्याच्यासोबत इटलीमधील लोकांनीही त्याच्याबरोबर डान्स केला. डान्सदरम्यान, परमिटानो देखील डिव्हाइससह सूर बदलताना दिसला. परमिटानोचे शरीर इथून तिथून जात होते आणि कधीकधी तो मागे-पुढे जात होता. त्याचे शरीर कधी-कधी उलटेही होत होते.
परमिटानो संदेशात म्हणाला की, ‘संगीत ही एक वैश्विक भाषा आहे, मी एक डीजे नाही, परंतु तरीही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत आहे.’ परमिटानोने त्याच्या सेटवर डीजेसाठी एक टॅबलेटचा वापर केला होता. परमिनोचा हा डान्स जगभरात व्हायरल होत आहे. लोक सोशल मीडियावरही डान्स शेअर करत आहेत.