जळगावः पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेसच्या नेत्या व राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp-state-president-chandrakant-patil) यांनी केली आहे. परंतू त्या अगोदर त्यांनी घरकुल घोटाळ्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या जळगावातील भाजपच्या 5 नगरसेवकांचे राजीनामे (resign) घ्यावेत, असे खुले आव्हान शिवसेनेने (shiv-sena-has-challenged) केले आहे.
महापालिकेतील सेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मंत्री यशोमती ठाकूर यांना एका प्रकरणात अमरावती न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्याबाबत ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील करत आहेत. मात्र न्यायालयाने शिक्षा ठोठावूनही जळगावतील भाजपच्या 5 नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले नाहीत. जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
त्या नगरसेवकांनी अद्यापही राजीनामे दिले नाहीत. ठाकूर यांचा राजीनामा मागणारे पाटील हाच नियम ते आपल्या पक्षातील नगरसेवकांना का लावत नाहीत, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे. आपले ठेवायचे झाकून आणि दुस-याचे पाहयचे वाकून अशी भाजपची भूमिका दिसत आहे. पाटील यांनी अगोदर त्या पाच नगरसेवकांचे राजीनामे घ्यावेत, त्यानंतर ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, असे महाजन यांनी म्हटले आहे.