लातूर : बहुजननामा ऑनलाईन – प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय यशस्वी करून इतरांसाठी आदर्श ठरलेल्या मराठा समाजातील ५२ कष्टकरी व्यावसायिकांचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. क्रोनोज फिटनेसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील होते. याप्रसंगी शिवाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, पोल्ट्री फीड उद्योजक विजय जाधव, पाटबंधारे विभागाचे अभियंता भोसले व जाधव यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मीना जाधव, वसुधा शिंदे, नंदा गोरे, वर्षा भराटे, साधना हांडे, सुमन सुंदर, वैशाली मुगराले, विजया मोहिते, भाग्यश्री नेलवाडे, शालुबाई माने, प्रीती मिसार, तेजश्री बावळे, नरसिंग इंगोले, गणेश शिंदे, परमेश्वर देशमुख, सचिन गांगले, श्रीहरी गायकवाड, चंद्रकांत समुदरे, दयानंद शिंदे, ज्ञानेश्वर निलंगे, चंद्रकांत राजे, उमेश गायकवाड, तुकाराम देशमुख, चंद्रकांत जाधव, महेश शिंदे, साहेबराव जाधव, बालाजी शिंदे, जयचंद्र सूर्यवंशी, प्रल्हाद बामणकर, कैलास शिंदे, हरीश बोडके, बाळासाहेब शिंदे, उद्धव जाधव, गोपाळ गोडसे, गोविंद लोखंडे, सिद्धेश्वर बिराजदार, नेताजी मोरे, सुनील पवार, देविदास माळवाले, संतोष जांभळदरे, सचिन शिंदे, रवींद्र मोरे, रामचंद्र सूर्यवंशी, रणजित जाधव, नितीन जाधव, महादेव पवार, अशोक हांडे, इंद्रजित भोसले, एम. सी. घाडगे, गजानन सोळंके, अमोल माने यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राम घाडगे यांनी केले. आभार निखिल मोरे यांनी मानले.