बहुजननामा ऑनलाईन टीम : कर्नाटकच्या मंगलुरू येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला अबू धाबी येथे २३ कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला आहे. मंगलूरूच्या २४ वर्षीय मोहम्मद फैय्याजला अबू धाबीवरून फोन आला की, आपल्याला जॅकपॉट लागला आहे. अबू धाबीमध्ये फियाजकडे १२ दशलक्ष दिरहमचा (सुमारे २३ कोटी रुपये) जॅकपॉट लागला आहे.
यापूर्वी त्याने सहा वेळा लॉटरीची तिकिटे खरेदी केली असल्याचे फैयाजने सांगितले. परंतु शेवटच्या वेळी त्याने ३० सप्टेंबर रोजी अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिग तिकीट लॉटरीचे तिकीट विकत घेतले. फय्याजने सांगितले की, एका दिवशी त्याला स्वप्न पडले होते कि , त्याला जॅकपॉट लागला आणि दुसऱ्या दिवशी त्याला अबुधाबीवरून फोन आला की आपल्याला जॅकपॉट लागला आहे.
त्याचवेळी बिग तिकीट संयोजकांनी सांगितले की, कंपनीने त्याला जॅकपॉट जिंकल्याची माहिती देण्यासाठी चार वेळा फैयाजला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. अखेर पाचव्या वेळी त्याने फोन उचलला ज्यानंतर त्यांना याविषयी माहिती देण्यात आली. फैयाजने सांगितले की, तो सध्या मुंबईत अकाउंटंट म्हणून काम करत. आहे. त्यांच्या पश्चात एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्याच्या पालकांचे निधन झाले आहे. त्याने सांगितले की या पैशांचा उपयोग आपल्या भावाच्या बहिणीचे शिक्षण आणि घर तयार करण्यासाठी करेल.
Visit : bahujannama.com