बहुजननामा ऑनलाइन टीम : मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्र पोलिसां कडून अटक झाल्याच्या निषेधार्थ भोकर येथील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आज दि ०६ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी पोलीस ठाणे भोकर येथे निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मुंबई येथील आरे जंगल तोड प्रकरणात विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना अटक केल्याने वंचित आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.
भाजपा, शिवसेना सरकारला इथली जागा हडप करायची आहे. एवढंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही स्वार्थ यामध्ये आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मुंबईकर या सरकारला आरे वृक्षतोडीवरुन योग्य उत्तर देतील असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करत आरे वृक्षतोडीच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. पवई फिल्टरपाडा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, अटकेच्या विरोधात भोकर तालुका भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानक भोकर येथे निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवला आहे. नेते प्रकाश आंबेडकर यांना तात्काळ पोलिसांच्या अटकेतून सोडले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे देण्यात आला आहे. यावेळी एल ए हिरे,भीमराव दूधारे,सुभाष तेले, दत्ता डोंगरे,सुनील कांबळे,दशरथ भदरगे,नागोराव शेंडगे,दत्ता डोंगरे,सूमेश फुगले,बाबूराव राठोड,बाळासाहेब टिकेकर, तुकाराम कयीलवाड,आनंदराव एडके, शंकर जिंकलवाड ,राहुल एडके, पुंजाराम डोकळे, भागाजी जाधव आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
Visit : bahujannama.com