लंडन : वृत्तसंस्था – गर्लफ्रेंडने किस केल्यानंतर कोणत्याही मुलाच्या आनंदाला पारावर राहत नाही. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, लंडनमधील एका तरुणाने गर्लफ्रेंडने किस केल्यानंतर थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावून त्याने गर्लफ्रेंडवर लाखो रुपयांचा दावा ठोकला आहे. मार्टिन एशले कॉन्वे असे तरुणाचे नाव आहे. त्याची गर्लफ्रेंड जोवाना लवलेस हिने त्याला किस केले होते.
किसमुळे आजारी पडला असल्याचा दावा करीत त्याने आता तिच्याकडून भरपाई मागितली आहे. मे 2019 मध्ये कॉन्वे आणि जोवाना यांची सोशल मीडियावर मैत्री झाली. त्यानंतर मैत्राीचे रुपांतर प्रेमात झाल्यामुळे 4 जुलै 2019 ला जोवानाने कॉन्वेला भेटायला बोलावले होते. यानंतर दोघंही सेंट्रल लंडनमध्ये भेटले होते. त्याठिकाणी दोघांनी एकमेकांना किस केला होता.
कॉन्वेने सांगितले त्याला झालेल्या इन्फेक्शनची लक्षणे फ्लूसारखी आहेत आणि त्याच्या तोंडात अल्सरही आले होते. त्याला इतका ताप आला की रुग्णालयात भरती व्हावे लागले. जोवानामुळेच आपण आजारी पडल्याचे त्याचे म्हणणे आहे. कॉन्वेने सांगितलं की जोवानाला सर्दी – ताप होता, हे त्याला माहिती नव्हते. जेव्हा तिचा मेकअप थोडा उतरू लागला तेव्हा त्याला याबाबत माहिती झाली. कॉन्वे म्हणाला यामुळे तो इतका आजारी पडेल याचा अंदाजाही त्याला नव्हता.