बहुजननामा ऑनलाईन – नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर बंदी घातल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘वाघिणी’च्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. ३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, देशभरात निवडणूका सुरु असून देशभरातील चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून अजून तीन टप्प्यातील मतदान होणार आहे त्यामुळे आचारसंहितेच्या कारणास्तव वाघिणी चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
भाजपा कार्यकर्त्यांकडून वाघिणी चित्रपट प्रदर्शनाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती .पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा आधारावरच ममता बॅनर्जी यांच्यावरील वाघिणी चित्रपट निवडणूक आयोगाने पाहावा, अशी मागणी करणारे पत्र भाजपने दिले होते.
दरम्यान, १० एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, राजकीय व्यक्तीचे अथवा पक्षाचे गुणगान करणारा कोणताही चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकत नाही.असे सांगितले होते याआधी निवडणूक आयोगाने पीएम नरेंद्र मोदी बायोपिकवर प्रदर्शनाच्या १ दिवस आधी बंदी घातली होती.