नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mamata Banerjee And PM Modi |सध्या मुख्यमंत्री पदावर हॅट्रीक करणा-या पश्चिम बंगालच्या (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज (मंगळवारी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट दिल्लीत घेतली आहे. आताच्या झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी कोणत्याही विषयावरून परस्परावर जोरदार टीका केली होती. त्या निवडणुकीनंतर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट (Mamata Banerjee meet PM Narendra Modi) घेतली आहे.
https://twitter.com/ANI/
पंतप्रधान मोदी आणि ममता यांच्यात जवळजवळ अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते. तर, या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीत मी कोव्हिड आणि राज्यातील कोरोना लसी आणि औषधांचा मुद्दा उपस्थित केला आहे. याव्यतिरिक्त अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पश्चिम बंगालच्या नामांतराचा मुद्दा देखील मी मांडला आहे.
या मुद्द्यावर ‘मी बघतो’ असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं असल्याची माहिती स्वतः ममता यांनी दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सलग तीनवेळा मुख्यमंत्री पदाची दावेदार झाल्यांनतर ममता बॅनर्जी यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे.
त्याअगोदर सीएम ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
मात्र पंतप्रधान मोदींची ममता यांनी प्रथमच भेट घेतली आहे.
Web Titel : Mamata Banerjee And PM Modi | west bengal cm mamata banerjee met prime minister narendra modi in delhi today discussed change of name of the state.
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 189 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी