Pune Corporation | शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी आमचीच – स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Pune Corporation | We are responsible for potholes in the city - Hemant Rasne, Chairman of the Standing Committee.

पुणे:बहुजननामा ऑनलाइन – Pune Corporation | नेहमीचा शिरस्ता बाजूला ठेवून मुदतीनंतरही शहरात खोदाईची कामे सुरू ठेवल्याने ऐन पावसाळ्यात शहरातील अनेक भागातील रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. Pune Corporation चे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Standing Committee Chairman Hemant Rasane) यांनी रस्त्यांवरील खड्डयांना आम्हीच जबाबदार असल्याचे मान्य केले असून येत्या 15 दिवसांत सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असेही जाहीर केले आहे. मात्र, त्याचवेळी प्रशासनाने पाऊस थांबल्याशिवाय खड्डे बुजविणे केवळ अशक्य असल्याचे सांगितल्याने पुणेकरांना अनिश्‍चित कालावधीसाठी ‘खड्डयातूनच’ प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात ड्रेनेज, पाणी पुरवठा, केबलसाठी खोदाईची कामे सुरू आहेत. विशेष असे की उपनगरांसोबतच मध्यवर्ती शहरातील शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोडसह अन्य रस्त्यांवर ड्रेनेज, पाईपलाईनची कामे करण्यात आली आहेत. वास्तविक महापालिका नियमानुसार 30 एप्रिल पर्यंत रस्ते खोदाईला परवानगी देते. तर ३१ मे पर्यंत रस्ते दुरूस्तीची कामे पुर्ण करणे बंधनकारक आहे. यावर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत कोरोनामुळे लॉकडाउन लावण्यात आला होता. यामुळे महापालिका प्रशासनाने शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या ड्रेनेज लाईन तसेच पाईपलाईनची कामे सुरू केली होती.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

रस्त्यावरील गर्दी कमी असेपर्यंत ही कामे करणे अपेक्षित होते. परंतू अनलॉकनंतरही काहीअंशी निर्बंध कायम असल्याने प्रशासनाने सत्ताधार्‍यांच्या मागणीनुसार कामे सुरूच ठेवली होती. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर खड्डयांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने तसेच पादचार्‍यांनाही जीवमुठीत घेउन चालावे लागत असल्याने 15 जूनपर्यंत सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पुर्ण करण्यात येतील, असे आश्‍वासन सत्ताधार्‍यांनी दिले होते.

वास्तविकत: जुलैमध्ये सलग सुरू झालेल्या पावसामुळे ज्याठिकाणी खड्डे बुजविण्यात आले होते, त्याठिकाणाचा भाग धसला आहे. तात्पुरती मलमपट्टी केलेेले बहुतांश खड्डे पुन्हा जैसे थ्या परिस्थितीत आले आहेत. मुळातच पावसामुळे संथ झालेल्या वाहतुकीला या खड्डयांमुळे ब्रेक लागला आहे. खड्डयांमुळे अनेकांना हाडांची दुखणी सुरू झाली आहेत. या खड्डयांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने शतकपार झालेल्या पेट्रोल आणि डिझेलही जाळावे लागत असल्याने वाहन चालकांना दुहेरी फटका बसत आहे.

मध्यवर्ती शहरातील जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम लॉकडाउनमध्ये सुरू करण्यात आले होते.
यासाठी रस्त्यांची खोदाई करावी लागली. सलग पडलेल्या मोठ्या पावसामुळे दुरूस्त करण्यात
आलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आमचीच असून येत्या १५ दिवसांत
शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील. तशा सूचना प्रशासनाला देण्यात येणार आहेत.

पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतू सतत सुरू असलेल्या
पावसामुळे खड्डे बुजवणे अवघड जात आहेत. पावसात खड्डे बुजविण्याचा सक्षम पर्याय नसल्याने
पाउस थांबताच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (Dr. Kunal Khemnar, Additional Municipal Commissioner)

web title : Pune Corporation | We are responsible for potholes in the city – Hemant Rasne, Chairman of the Standing Committee.

Mamata Banerjee And PM Modi | ‘पश्चिम बंगालचं नाव बदला’ ! ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट

Bhosari Crime | ‘त्या’ खुन प्रकरणात गोल्डनमॅन दत्ता फुगेच्या मुलासह दोघांना अटक, प्रचंड खळबळ

Tokyo Olympic 2020 | ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या आनंदात महिला अ‍ॅथलीटच्या तोंडातून निघाली ‘शिवी’, पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाली ती

Rain in Maharashtra | आगामी 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज