मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आखाडा संपल्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात निवडणुकीचा खेळ रंगणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. मोठ्या पदासाठी इच्छुक मर्यादित असतात. त्या ठिकाणी आघाडी करणे सोपे असते. मात्र स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असते. त्यात मतदार मर्यादित असल्याने कोण निवडून येईल, याची खात्री देणे अवघड असते. त्यामुळे जागा वाटप करणे व सर्वांचे समाधान करणे शक्य नसते. त्यामुळे जागा वाटप करताना महाविकास आघाडीची या ग्रामपंचायतींमध्ये कसोटी लागणार आहे.
या निवडणुकीचा कार्यक्रम असा :
तहसिलदार निवडणुक नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक : १५ डिसेंबर २०२० (मंगळवार)
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ / २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ : ३१ डिसेंबर सकाळी ११ पासून छाननी संपेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ : ४ जानेवारी २१ दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ ४ जानेवारी २१ दुपारी ३ नंतर मतदानाचा दिनांक : १५ जानेवारी सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत (गडचिरोली जिल्ह्यासाठी सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंत).
मतमोजणीचा दिनांक : १८ जानेवारी २०२१
निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हानिहास संख्या : ठाणे १५८, पालघर ३, रायगड ८८, रत्नागिरी ४७९, सिंधुदुर्ग ७०, नाशिक ६२१, धुळे २१८, जळगाव ७८३, अहमदनगर ७६७, नंदुरबार ८७, पुणे ७४८, सोलापूर ६५८, सातारा ८७९, सांगली १५२, कोल्हापूर ४३३, औरंगाबाद ६१८, बीड १२९, नांदेड १०१५, उस्मानाबाद ४२८, परभणी ५६६, जालना ४७५, लातूर ४०८, हिंगोली ४९५, अमरावती ५५३, अकोला २२५, यवतमाळ ९८०, वाशीम १६३, बुलढाणा ५२७, नागपूर १३०, वर्धा ५०, चंद्रपूर ६२९, भंडारा १४८, गोंदिया १८९, गडचिरोली ३६२,