मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patient) संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत आज (सोमवार) रुग्णसंख्या कमी आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज जास्त आहे. राज्यात आज 6 हजार 740 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 13 हजार 027 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 58 लाख 61 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.02 टक्क्यावर गेला आहे. Maharashtra State Coronavirus Update
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात आज 51 रुग्णांच्या मृत्यूची (Deaths) नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.01 टक्के आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 23 हजार 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 827 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 27 लाख 12 हजार 460 प्रयोगशाळा (Laboratory Test) नमुन्यांपैकी 61 लाख 04 हजार 917 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1412080431726424068?s=20
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 150 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 249 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 15 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 10.
– 290 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 479882.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2679.
– एकूण मृत्यू – 8617.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 468586.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4084.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 161 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 037 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 01 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 259154.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1472.
– एकूण मृत्यू – 4293.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 253389.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5200.
पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.32 टक्के
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 56 हजार 236 रुग्णांपैकी 10 लाख 27 हजार 933 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 10 हजार 414 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 889 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.32 टक्के आहे.
Web Title : Maharashtra State Coronavirus Update
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Anti Corruption Trap | 75 हजाराची लाच घेताना प्रभारी नायब तहसिलदारासह तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात