मराठा आरक्षण मिळाले तर राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल. या संबधी ३० नोव्हेंबर, २०१८ मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या तर काही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात आज उच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे.
विनोद पाटील काय म्हणाले : मराठा आरक्षणासंदर्भातील आज येणारा निकाल हा फक्त निकाल नसून या निकालावर मराठा समाजाची एक पिढी अवलंबून आहे. आजचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच लागेल याचा मला विश्वास आहे. आजचा निकाल जर आमच्या बाजूने लागला तर ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल आणि ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील तसेच मराठा समाजातील तरुणांमध्ये शिक्षणाकडे येण्याच्याबाबतीत आकर्षण निर्माण होईल असे पाटील म्हंटले आहे.