Maharashtra Political Crisis | बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या; राष्ट्रवादीचा सल्ला

MNS On NCP -Shivsena | shiv sena is sharad pawars caged cat in the zoo mns leader sandeep deshoande snarky criticism
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) 16 आमदारांविरोधात अपात्रतेच्या नोटिसीनंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल याचिकेवर आज 11 जुलैला सुनावणी होणार होती, परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने शिंदे-फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सुधारित पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिंदे गटाला इतर पक्षात विलिन होणे आवश्यक आहे, अन्यथा अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने (NCP) मित्रपक्षांना एक सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी म्हटले आहे की, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या.

 

अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, साहेब बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या. चिन्ह जवळपास तशीच दिसताहेत. एकदा का हा डाव भाजपानी साधला. तर मात्र आधुनिक मावळ्यांनी आजच्या औरंगजेबाला घाबरून त्याचे मांडलिकत्व स्विकारले असा नवा इतिहास पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील. अखंड सावध असा. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी ठांब उभा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तसे जाहीरपण वक्तव्य सुद्धा केले होते. यानंतर आजच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिवसेनेच्या बंडखोरांवर निशाणा साधताना म्हटले होते की, मित्र पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेला (Shivsena) शेवटपर्यंत साथ दिली आहे आणि यापुढेही देत राहणार. शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आधीच ठरवले होते आणि बाळासाहेबांच्या आदेशाच्या वेगळे काही करणे हे बाळासाहेबांना दुखावण्याचे काम आहे.

यापूर्वीही अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपाला खोचक टोला लगावला होता.
या ट्विटमध्ये म्हटले होते की, सद्यस्थिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस दुसर्‍या,
चंद्रकांत पाटील तिसर्‍या तर इतर भाजप नेते चौथ्या व पुढच्या नंबरवर फेकले गेलेत.
विश्वास आहे शिंदेसाहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | ncp amol mitkari warns about eknath shinde group likely merge in bjp

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut | उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज ?; चर्चांना उधाण

 

Dengue Patients-Pune Corona | शहरात कोरोनासोबतच डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ! डेंग्यु रोखण्यसाठी नागरिकांनी स्वत:च्या घरापासून काळजी घ्यावी; महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

 

Pune ACB Trap On PMC Officers | 40 हजाराच्या लाच प्रकरणी पुणे मनपाच्या उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक