मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) भाजपाकडून (BJP) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूक रिंगणात आहेत. सुरूवातीपासून शिवसेना विरोधकांच्या बाजूने असली तरी शिवसेनेचे काही खासदार भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याच्या बाजूने आहेत. या निवडणुकीसंदर्भात आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या बैठकीत सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. यावेळी खासदार संजय राऊत नाराज झाल्याचे वृत्त आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांनी यशवंत सिन्हा यांनाच पाठिंबा द्यावा, अशी शिवसेना नेते संजय राऊत यांची इच्छा आहे.
आज मातोश्रीवरील बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी भाजपाच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदारांच्या या भूमिकेवर संजय राऊत नाराज झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
आता पक्षप्रमुख राष्ट्रपतीपदाच्या कोणत्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut)
संसदेतील शिवसेनेच्या 22 खासदारांपैकी केवळ 15 खासदार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थितीत होते.
राज्यसभेतील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी तर लोकसभेतील 19 पैकी अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत,
श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, राजेंद्र गावित,
ओमराजे निंबाळकर आदी 12 खासदार उपस्थित होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील,
कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार मातोश्रीवरील आजच्या बैठकीला अनुपस्थित होते.
राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
Web Title :- Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut | after the meeting of shiv sena mps the discussion has started that mp sanjay raut is upset
हे देखील वाचा :
Raja Mane | राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर