पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune PMC News | केवळ सातच दिवसांच्या पावसामुळे शहरातील रस्ते ‘खड्ड्यात’ गेले आहेत. प्रामुख्याने चोवीस तास पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन आणि केबल्सच्या कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांची वरचेवर केलेली ‘मलमपट्टी’ हेच यामागील प्रमुख कारण आहे. दरम्यान, महापालिकेकडे आतापर्यंत खड्ड्यांबाबत ५०० हून अधिक तक्रारी आल्या असून उघडीप मिळताच तातडीने खड्डे बुजुविण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Pune PMC News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरातील सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते वगळता बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे. रस्त्यांवरील वाहतूक अत्यंत संथ झाली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मागील आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे खड्ड्यांची दुरूस्ती देखिल होताना दिसत नाही. तर अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिस नसल्याने पुढे जाण्याच्या नादात वाहतुकीचा खोळंबा होताना पाहायला मिळत आहे. मध्यवर्ती शहरात अनेक ठिकाणी अरुंद गल्ल्यांमध्ये नो पार्किंगमध्ये उभ्या राहाणारी चार चाकी वाहने देखिल कोंडीत भर घालत आहेत. यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि नोकरदारांनाही वेळेत शाळेत व कामाच्या ठिकाणी तसेच घरी परतण्यास विलंब होत आहे. (Pune PMC News)
शहरामध्ये सततच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. प्रामुख्याने ज्याठिकाणी चोवीस तास पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईनची कामे झाली आहेत, त्या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्या पाउस असल्याने ब्लॉक व वीटा वापरून तात्पुरते खड्डे बुजविण्यात येत आहेत. आणखी दोन तीन दिवस पावसाची शक्यता आहे. पाउस थांबताच युद्ध पातळीवर सर्व खड्डे बुजविण्यात येतील. यासाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
– व्हि.जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका. (VG Kulkarnai PMC)
खड्ड्यांची प्रमुख कारणे
– चोवीस तास पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेले डांबरी रस्ते सिमेंट कॉंक्रीटने बुजविण्यात आले.
डांबरी रस्ते व कॉंक्रीटचे पॅचवर्क ज्याठिकाणी आहे तेथे खड्डे पडले आहेत.
– सिग्नल सिंक्रोनायजेशनसाठी चौकांमध्ये खोदाई करण्यात आली आहे. तेथे बरेच ठिकाणी ब्लॉक्स बसविण्यास आले आहेत.
याठिकाणी देखिल ब्लॉक्स व डांबरी रस्ता एकरुप न झाल्याने खड्डे पडले आहेत.
– शहरातील काही रस्त्यांची कामे अगदी पावसाळ्यापुर्वी करण्यात आली आहेत. या रस्त्यांवरील ड्रेनेज लाईन्सची झाकणे वर उचलली नाहीत.
याठिकाणीही वाहनांमुळे झाकणांच्या कडेचा भाग खचून खड्डे तयार झाले आहेत.
– गोळीबार मैदान चौकाजवळ शंकर शेठ रोडवर अवजड वाहतूक असताना कॅन्टोंन्मेंट बोर्डने मेन्टेनन्सचे कामच न केल्याने मोठ्याप्रमाणावर खड्डे झाले आहेत.
Web Title :- Pune PMC News | The roads in the city are in a ditch! Superficial ‘dressings’ made after excavation cause pits; As many as 500 complaints of potholes across the city
हे देखील वाचा :